Ramchandra Sabale Havaman Andaj
नमस्कार पावसासाठी पोषक वातावरण. तर या तारखेला मान्सून सक्रिय होऊन राज्यात बरसणार सर्वदूर पाऊस. रामचंद्र साबळे यांनी दिली माहिती. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.
हवामान अंदाज । आजचे हवामान महाराष्ट्र live
बर्याच दिवसांच्या विश्रांती नंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, लवकरच राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असून, 8 ते 10 जुलैपासून सर्वदूर पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले आहे.
Weather Forecast Maharashtra
तर 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी करता येईल तर या काळात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयार राहावे. यात शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीने सोयाबीन, तूर याची पेरणी करावी. तर खरीप ज्वारी आणि बाजरी चे पीक घेणे योग्य राहील.
हे पण वाचा –
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
हवामान अंदाज व कृषी सल्ला
पण 15 जुलैनंतर मूग आणि उडीदाचे पीक घेणे योग्य नाही. त्याऐवजी सोयाबीनची पेरणी करणे योग्य राहील, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिले. खरीपाच्या पेरण्या झालेल्या भागात, दाट पेरणी झाली असेल तेथे विरळणी करावी.
एक महिन्याचे पीक झाले असेल, तिथे एक कोळपणी खुरपणी करावी असा कृषी सल्ला रामचंद्र साबळे यांनी दिला.
तर राज्याच्या काही भागात आज पावसाला सुरुवात होणार असून, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र