नमस्कार पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार. कमी दाबाचे क्षेत्र विस्तारले तर आजपासून पावसाचा जोर वाढून इतक्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पाहूया यासंबंधी सविस्तर बातमी.
अनुक्रमणिका
Toggle१७ ते २१ जुन २०२१ आजचे हवामान अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली होती तर हवामान खात्याने (हवामान अंदाज विभाग) पावसाचा खंड पडेल अशी शक्यता वर्तवली.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती पण आता पावसाचा जोर काही प्रमाणात वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार आज पासून पुढील तीन ते चार दिवस मुंबई ठाण्यासह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली.
Havaman Andaj Today | Weather Forecast
मान्सून उत्तरेकडील राज्यांमध्ये गेल्याने राज्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला त्यानंतर कोकण मराठवाडा व विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होऊन कमी अधिक पाऊस पडत आहे.
सध्या खान्देश मध्य महाराष्ट्राचा पूर्व भागात मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून राहिली अनेक भागात पावसाने चांगलीच ओढ दिल्याने सकाळपासून उन्हाचा चटका वाढला.
आजचा पावसाचा अंदाज – कमी दाब क्षेत्र अपडेट
त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापासून वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागात आणि मध्य अरबी समुद्र ते कोकण किनारपट्टी च्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
हवामान अंदाज कोकण विभाग
तर आज कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हे पण वाचा
Havaman Andaj Vidarbha
तर विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा वगळता तर मध्य भारतातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याच्या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा पावसाचा अंदाज
तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सोलापूर सांगली आणि विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
खालील व्हिडिओ पाहायला विसरू नका
तर शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे आजच्या पावसाचा अंदाज 2021 (आजचे हवामान) सोबतच पुढील चार दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाल आहे अशाच प्रकारे तुम्ही जर ही माहिती व्हिडीओ स्वरुपात पाहू इच्छित असाल तर आत्ताच आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चैनल Subscribe करा आणि आपल्या वेबसाइटला सुद्धा नोटिफिकेशन On करून ठेवायला विसरू नका.
हे पण वाचा –
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट