× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather forecast for Tomorrow राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; पहा आजचे हवामान कसे असेल आणि या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिकांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, असंदेखील त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याचे तसेच त्याबाबत नागरिकांना सतर्क करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहेत. याबरोबरच राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी, बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी, अशा सुचना प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अशा क्षेत्रात वाहतूक बंद करावी आणि ती पर्यायी मार्गावर वळवावी. हवामान खात्याशी समन्वय साधावा, त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्टस् (इशारे), माहिती यासंदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे, पूरग्रस्त क्षेत्रात अन्नधान्य, औषधे आणि साह्यकार्य साहित्य उपलब्ध करून ठेवावे. पर्यायी निवारास्थाने आणि राहण्यासाठी ठिकाणे उपलब्ध करून ठेवावीत, पूरस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था तयार ठेवावी, असं प्रशासनाला सांगण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शहरांमध्ये पाणीदेखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. महत्त्वाचे म्हणजे, हवामान विभागाने आजसुद्धा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

कोकणात आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्री पासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे.कोकमत आज मुसळधार पवसास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Kokan Weather Prediction, July22 : कोकणात आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊसचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्री पासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे.कोकणात आज मुसळधार पवसास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर अध्याप ही रत्नागिरीत कायम असून पुढच्या 24 तासात IMD मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain)पडत आहे.

कोकणात या सतत पडणाऱ्या पावसामुळं नद्या धोक्याची पातळी वरुण वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीव विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पानी साचले आहेत.मात्र कोकणात घाटमाथ्यावर आज ही अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर पाहून नागरिकांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.आता कोकणात उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान विभागाने कोकण उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.

कोकणस मुंबईत सुद्धा पावसाचा हाहाकार चालू आहे.मुंबईमध्ये पावसाने जोर धरला असून अनेक उपनगरीय भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) X वर पोस्ट करत नागरिकांना पाणी साचलेल्या भागाची माहिती दिली आहे. डी. एन. नगर येथील अंधेरी भुयारी मार्गाजवळ 2 फूट पाणी साचल्याने सदर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथील दक्षिणेकडील वाहतूक गोखले पुलामार्गे, तर उत्तरेकडील वाहतूक ठाकरे पुलामार्गे वळविण्यात आली आहे. याशिवाय, खार भुयारी मार्गाजवळ 1 ते 1.5 फूट पाणी साचल्यामुळे खार भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सदर वाहतूक लिंकिंग रोडने वळविण्यात आली आहे.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon