× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
IMD Weather Update

IMD Rain alert for maharashtra : भारतीय हवामान विभागानं मुंबई, पुण्यासह राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

IMD alert for maharashtra : राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला असताना हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढवली आहे. येत्या काही तासांसाठी हवामान विभागानं राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर, ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषत: पुणे जिल्ह्यात काल पावसानं जोर धरला. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणं, ओढे, नद्या भरून वाहू लागल्या आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, रायगड साताऱ्यातही अशीच परिस्थिती आहे.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

पावसानं असा जोर धरला असतानाच हवामान विभागानं मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, पालघर, अहमदनगर, रत्नागिरी, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मुंबई व मुंबई उपनगर वगळून राज्यात मागच्या २४ तासांत सरासरी ३३.७ मिमी पाऊस झाला आहे. तर, मुंबई शहरात ६२.५ व मुंबई उपनगरात ८६.१ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासांत राज्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. पुणे नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्यानं विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. तर, मुळशी तालुक्यातील आदरवाडी इथं दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत एनडीआरएफची ११ पथकं तैनात करण्यात आली आहेत. तर, ७ पथकं राखीव ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी मुंबई व रत्नागिरीत प्रत्येकी दोन पथकं आहेत. ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रत्येकी १ पथक आहे. ही पथकं ३१ ऑगस्ट पर्यंत तैनात राहणार आहेत. तर, ७ पथके राखीव असून ती सध्या मुंबई, पुणे व नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. तर, एसडीआरएफची ६ पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

राज्य सरकारकडून प्रशासनाला सूचना

  • महावितरणने आवश्यकतेनुसार वीज पुरवठा बंद करावा.
  • पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा.
  • लवासा व ताम्हिनी इथं दरड कोसळल्याच्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवा.
  • कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पुणे, रायगड व मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन व विकास निधीतून खर्च करावा.
Havaman Andaj Today image 1
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 16

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे, अनेक भागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

02

Havaman Andaj Today image 2
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 17

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यात आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

03

Havaman Andaj Today image 3
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 18

पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं या भागातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.

04

Havaman Andaj Today image
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 19

हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यात हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

05

Havaman Andaj Today image 4
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 20

मुंबईबाबत बोलायचे झाल्यास मुंबईत पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

06

Havaman Andaj Today image 5
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 21

मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

07

Havaman Andaj Today image 6
IMD alert for maharashtra : चिंता कायम! महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट; शाळांना सुट्टी, हवामान विभागाचा हायअलर्ट राज्यातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट 22

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 24 तासांसाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon