आजचे हवामान महाराष्ट्र : प्रादेशिक हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजनुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
अनुक्रमणिका
Toggleराज्यातील आजचे हवामान महाराष्ट्र कसे असेल?
हवामान विभागानं महाराष्ट्रात आज रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सागंली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
27 ऑगस्टचा पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात उद्या प्रामुख्यानं पूर्व विदर्भाला यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
28 ऑगस्टला राज्यात पाऊस कुठे होणार
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
29 आणि 30 ऑगस्टला इथे मुसळधार
प्रादेशिक हवामान विभागानं राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो.
हे पण वाचा:
हे पण वाचा
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा
जून महिन्यात हवामान विभागानं यंदाचा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तवला होता. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उघडीप दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. पीक वाचवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झालं होतं.
जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.
राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितला आजचे हवामान महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये कशाप्रकारे असणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सुद्धा यामध्ये पाहायला तरी तुम्हाला अजून कुठला अंदाज पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही माहिती शेअर करून कृषी पत्रकारितेला सहभाग नक्की नोंदवा धन्यवाद
source:- TV9 Marathi