Monsoon 2022: राज्यातील खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये हवामान विभागाचे होसाळीकर यांनी राज्यातील मान्सूनच्या आगमनासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाच्या काहिलीमुळे मेटाकुटीला आलेल्या नागरिकांसाठी हवामान विभागानं (Indian Meteorological Department) आनंदाची बातमी जाहीर केली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात १६ मे रोजीच आगमन झालं आहे.
याशिवाय केरळमध्ये येत्या १७ मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान () विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.
होसाळीकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये २७ मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात जास्त पाऊस
दरम्यान, होसाळीकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या माहितीनुसार यंदा मराठवाड्यामध्ये सामान्यपेक्षा जास्त अर्थात Above Normal पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एकूणच समाधानकारक पाऊस राहण्याची शक्यता आहे. देशात ला नीनाची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा –
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
- Monsoon Breaking News: राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजपासून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!