Panjab Dakh Monsoon Update: राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा (Rain) जोर ओसरला आहे. गेल्या दोन दिवसापासून राज्यात पावसाचा (Monsoon) जोर कमी झाला असून सूर्यदेवाचे दर्शन देखील घडतं आहे. मात्र, राज्यात 10 जुलैपासून ते 15 जुलैपर्यंत खूपचं पाऊस पडला होता.
हे पण वाचा – Maharashtra rain IMD Alert: 20 जुलैपर्यंत “या जिल्ह्यात” कोसळणार धो-धो पाऊस; वाचा पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज
या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon News) शेतकरी बांधवांच्या खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली, यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुबार पेरणी करावी लागणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
हे पण वाचा – बापरे…! ‘या’ 10 गाईच्या जातींचे पालन सुरु करा अन, लाखों नव्हे करोडो कमवा
शिवाय खरीप हंगामातील पिकांसाठी केलेली मेहनत देखील वाया जाणार आहे. एवढेच नाही तर आता खरीप हंगामात दुबार पेरणी केल्यास पिकं काढणीसाठी देखील उशीर होणारं आहे. मात्र आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा नव्या जोमाने शेतीकामासाठी लटकला आहे.
हे पण वाचा – अवघ्या 6 तासात बनवा स्वतःचे किसान क्रेडिट कार्ड, जाणून घ्या… । How to Make KCC in Marathi
दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांचा नवीनतम मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) जाहीर करण्यात आला आहे.
पंजाबराव यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित मान्सून अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), आज पासून राज्यातील हवामानात मोठा बदल घडून येणार आहे. आज 17 जुलै पासून राज्यात पुन्हा एकदा मोसमी पावसाचा जोर वाढणार आहे.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा
17 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. मात्र या कालावधीत राज्यात सर्वदूर पाऊस नसणार आहे. म्हणजेचं 17 जुलै ते 21 जुलै दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस कोसळणार आहे.
या कालावधीत सर्वाधिक पूर्व विदर्भात पाऊस कोसळणार असल्याचे पंजाबरावं डख (Panjabrao Dakh) यांनी आपल्या सुधारित अंदाजात नमूद केले आहे. निश्चितच गेल्या दोन दिवसापासून पावसाची उघडीप राहिल्याने शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मात्र आता पुन्हा एकदा हवामानात बदल झाला असून मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याने राज्यातील ठराविक जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार ते अति-मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. दरम्यान या कालावधीत सूर्यदर्शन देखील होत राहणार आहे.
पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, निश्चितचं शेतकरी बांधवांच्या काळजाची धडधड पुन्हा एकदा वाढली आहे. दरम्यान पंजाब राव (Panjabrao Dakh Weather News) यांनी शेतकरी बांधवांना खरीप पिकांचा विमा काढून घेण्याचा सल्ला देखील यावेळी जारी केला आहे. निश्चितच पंजाबरावं यांनी वर्तवलेल्या या सुधारित अंदाजामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे.
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 18 जुलै 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद