Maharashtra Weather Update 12 July 2024 : आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर पुन्हा वाढणार.
मुंबई, १२ जुलै २०२४: गेल्या दोन-तीन दिवसांच्या सुसवाटीनंतर महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. आज शुक्रवार, १२ जुलै रोजी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा जारी केला आहे.
Maharashtra Weather Update 12 July 2024
पावसासोबतच जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे.
आजपासून १५ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आजचे हवामान
पुणेसह कोकणातही जोरदार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान खात्याने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशामध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो.
उद्याचा हवामान अंदाज
Heavy Rain Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अशात आज देखील राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार, राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून येत्या 12 ते 14 जुलै असे तीन दिवस या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Heavy Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अशात आज देखील राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 12 ते 14 जुलै असे तीन दिवस या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा
हवामान उद्या पाऊस वेळ टेबल
भारतीय हवामान विभागानुसार, येत्या दोन दिवसांत भारताच्या ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 12 ते 15 तारखेदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. 11 ते 13 तारखेदरम्यान पश्चिम हिमालयी प्रदेशात आणि पुढील 5 दिवसांत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्रात आज आणि पुढचे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह परिसरात यलो अलर्ट
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि ठाण्यासह परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पालघरमध्ये 12 आणि 13 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, 2 दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या मुसळधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवा आणि विमान सेवा विस्कळीत झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
विदर्भातही यलो अलर्ट
हवामान विभागातर्फे विदर्भात देखील पावसाचा यलो अर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, या भागात 12 ते 14 जुलै दरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी पावसाच्या काळात खबरदारी घ्यावी, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे.