Maharashtra Weather | यंदाच्या मोसमी पावसाचे दुसरे पुर्वानुमान स्कायमेटने जाहीर केले आहे. यानुसार यंदाचा पाऊस सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के पाऊस यंदा देशभरात अपेक्षित आहे. (Skymet Monsoon Prediction 2022)
2022 monsoon prediction
जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी पावसाची दीर्घकालीन सरासरी ८८०.६ मिमी आहे. दरवर्षी या आकडेवारीशी तुलना करून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. यंदाचा मोसमी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९८ टक्के इतका बरसणार आहे.
Rainy season in India 2022
स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या गेल्या दोन ऋतूंवर ला निनाचा प्रभाव दिसून आला आहे. तत्पूर्वी ला निनाचा प्रभाव हिवाळ्याच्या ऋतूत वेगाने घटत असे; मात्र पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती अधिक असल्याने ला निनाचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया थांबली आहे. नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपर्यंत ला निनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल निनोची शक्यता नाही.
देशभरातील पाऊस सरासरीइतका होणार असला तरीही राजस्थान, गुजरात आणि ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे या मोसमात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केरळ आणि उत्तर कर्नाटकच्या अंतर्गत भागात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य महिन्यांमध्ये पाऊस कमी होईल. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्रांत आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशच्या पर्जन्यक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील.
ला निना आणि अल निनो म्हणजे काय ? प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील पृष्ठभागाचे तापमान अधिक असते, अशा स्थितीला ‘अल निनो’ म्हणतात. अशावेळी भारतात पाऊस कमी पडतो. याउलट, प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडील पृष्ठभागाचे तापमान अधिक असते, अशा स्थितीला ‘ला निना’ म्हणतात. अशावेळी भारतात पाऊस अधिक पडतो.
हे पण वाचा:
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
- Monsoon Breaking News: राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजपासून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंजाबराव डख यांचा २१ जून २०२५ पर्यंतचा हवामान अंदाज; ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पाऊस | Punjab Dakh Havaman Andaj
नाव | स्कायमेट हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | स्कायमेट हवामान विभाग |
पत्ता | Skymate & IMD Mumbai |
दिनांक | 12 एप्रिल 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद
Web Title: Monsoon 2022: How will this year’s rain be? A new version of Skymet Weather Report for this year has arrived