Maharashtra Monsoon 2023 Latest News : राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला. पण पावसाने हजेरी लावताच जूनच्या अखेरच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात तुफान पाऊस पाहायला मिळाला. यानंतर पावसाने विकेंडला ब्रेक घेतल्याचं चित्र होतं. पण आता पुढच्या ३ दिवसांमध्ये हवामान खात्याकडून ४ विभागांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर वेदर रिपोर्ट…
अनुक्रमणिका
Toggleआज पाऊस पडणार आहे का ?
राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळालं. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धुवांधार झालेला पाऊस आता कमी झाला आहे. पण अशातही राज्यात जुलैचा पहिला आठवडा मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
खरंतर, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
उद्या पाऊस आहे का ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओरसला आहे. हा एल निनोचा प्रभाव आहे. यामुळे घाटमाथा सोडला तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस होईल. तर विदर्भात २ दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. ज्यामुळं इथं यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता असून इथंही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हे पण वाचा – दि. 3 व 4 जुलै 2023 चा पाच दिवसांचा हवामान अंदाज, या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस
दरम्यान, मुंबईच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ जुलैपर्यंत उत्तर-दक्षिण कोकण, गोवा आणि पूर्व-पश्चिम विदर्भात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. तर इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तर घाटमाथावर पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.
संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट (Weather Report Weekly )
उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच उत्तर कोकणात पाऊस सुरू आहे. अशात ५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे.
दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही ५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
लाईव्ह हवामान अंदाज
उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरकळ ठिकाणी पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर ५ जुलैला मात्र जिल्ह्यात सर्वत्र पाऊस असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra )- हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर ५ जुलैला मात्र पाऊस ओसरले अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यावेळी काही भागांमध्ये मध्यम ते तुरळक पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मराठवाडा (Marathawada )- मराठवाड्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून उद्या तुरळक पावसाचा इशारा आहे. तर ५ जुलैलादेखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ (East Vidarbha – West Vidarbha )- मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात आजपासून ५ जुलैपर्यंत अतिमुळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 3 जुलै 2023 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.