Maharashtra Monsoon 2023 | राज्यातील काही भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्यातील अनेक भागामध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाचा चिंता आणखी वाढली आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यात पेरण्या शेतीकामे खोळंबली आहेत.
अनुक्रमणिका
Toggleआज पाऊस पडणार आहे का ?
तर सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर, ठाणे,पुणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर दिसून येत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Latest Marathi News)
उद्या पाऊस आहे का ?
तर येत्या ४-५ दिवसांमध्ये संमिश्र पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. १३ जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)
संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट (Weather Report Weekly )
10 Jul; महाराष्ट्रात पुढील 4, 5 दिवस पाऊस संमिश्र राहील, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 10, 2023
13 जुलै नंतर सुधारणा.@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/VsWYFVaxnJ
लाईव्ह हवामान अंदाज
तर आजपासुन म्हणजेच ११ जुलैपासुन महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर १२ जुलै रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.(Latest Marathi News)
हे पण वाचा
येत्या 48 तासात हवामान अंदाज
उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. एनडीआरएफची ३९ पथके तैनात करण्यात आली आहेत. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणात पावसाने हाहाकार उडाला आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 11 जुलै 2023 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.