Monsoon Update: नमस्कार शेतकरी बांधवांनो, हवामान अंदाज.इन (Monsoon Update Today) मध्ये स्वागत. आज आपण पंजाब डख यांचा हवामान अंदाज (Punjab Dakh Monsoon News) जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
Monsoon Update: राज्यात सध्या पावसाचे (Monsoon) वातावरण असल्याने शेतकरी बांधवांचे हवामान अंदाजाकडे (Monsoon News) मोठे बारीक लक्ष लागून आहे. राज्यात गेल्या काही दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली असल्याने शेतकरी बांधवांच्या खरिपातील पिकांची मोठी नासाडी झाली आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. दरम्यान आता हवामानात मोठा बदल होत असून पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान बघायला मिळत आहे.
हंगामाच्या सुरुवातीला पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आता पाऊस उघडत असल्याने समाधान बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांच्या मते, मुसळधार पावसामुळे त्यांचा पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे आणि आता अनेक शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागू शकते.
यामुळे पावसाची उघडीप जरी झाली असली तरी देखील शेतकरी बांधवांची चिंता काही मिटलेली नाही. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या पंजाबरावांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) देखील समोर आला आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, राज्यात आज म्हणजे 20 जुलैपासून पाऊस ओसरणार असून अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. मात्र असे असले तरी तीन चार दिवसानंतर पुन्हा एकदा मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. यामुळे 23-24 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात मोसमी पाऊस जोरदार कोसळणार आहे.
हे पण वाचा
परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबरावं डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे. तसेचं आजपासून राज्यातील उत्तर महाराष्ट्रात आणि उर्वरित भागात देखील सूर्याचे दर्शन होणारं आहे.
मात्र असे असले तरी पुन्हा एकदा मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याचे देखील हवामान तज्ञ पंजाबराव यांनी (Panjabrao Dakh News) वर्तवली आहे. पंजाब राव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार(Panjab Dakh Weather Report), 23, 24 आणि 25 जुलै रोजी राज्यात अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र तीन दिवस पावसाची उघडीप राहिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचे भाकित पंजाबरावांनी सांगितलं आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, 28, 29, 30 जुलै रोजी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा –
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट