Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर ढगाळ हवामानाची शक्यता आहे आणि राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या दहा जिल्ह्यांमध्ये अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवत आहे.
अर्थातच आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सोमवारपासून मात्र या भागातील हवामान देखील कोरडे होणार आहे आणि थंडीची तीव्रता आणखी वाढणार आहे.
9 डिसेंबर पासून ते जवळपास 14 डिसेंबर पर्यंत म्हणजेच हे सहा सात दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. या काळात थंडीचा जोर वाढणार असून राज्यातील कमाल आणि किमान तापमान लक्षणीय कमी होण्याची शक्यता आहे.
पण, 14 तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान कलाटणी घेणार असा अंदाज आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे 15 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बिघडण्याची शक्यता आहे.
15 डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज पंजाब रावांनी आपल्या या नव्या बुलेटीन मध्ये दिला आहे.
हे पण वाचा
त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाब रावांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. खरे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मात्र भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात कुठेच एवढा मुसळधार पाऊस झाला नाही. राज्यात फक्त ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि काही ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला.
वर्तवलेल्या भाकीताप्रमाणे राज्यात कुठेच मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र असे असले तरी काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झालेले आहे.