IMD Alert Monsoon Update: राज्यात गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचा (Rain) जोर लक्षणीय कमी झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने (Monsoon) आता उसंत घेतली असल्याने शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर देखील समाधान बघायला मिळत आहे.
मात्र सध्या राज्यातील पूर्वेकडे विशेषता विदर्भात पावसाचा (Monsoon News) जोर वाढताना बघायला मिळत आहे. अजून पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज देखील आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार असल्याचे भाकित देखील वर्तवले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, मराठवाड्यात सुद्धा आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. निश्चितच गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अकोला, नागपुर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या संकटात भर पडणार आहे.
खरं पाहता, पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी बांधवांना शेतीची कामे करता येत होती. आधीच राज्यातील काही भागात अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असल्याने रोगराईचे सावट वाढले आहे यामुळे शेतकरी बांधवांना फवारणीचे कामे करावी लागत आहे.
आता पुन्हा एकदा पाऊस येण्याची शक्यता असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होणारं असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या पंजाब रावांचा देखील अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) सार्वजनिक करण्यात आला आहे.
हे पण वाचा
पंजाब राव (Panjabrao Dakh) यांच्या मते, 25 जुलैपर्यंत राज्यातील अनेक विभागात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या नवीनतम अंदाजानुसार (Panjab Dakh Weather Report), राज्यातील पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात तसेच कोकणातील काही जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत पावसाची दाट शक्यता आहे.
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापुर, अहमदनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे.