हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

rain latest update तुफान पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

Red alert issued in Konkan: या दोन दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्ठी, जगबुडी, काजळी आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाशिष्ठी आणि जगबुडीने गेल्यावर्षी महापुराने अक्षरशः थैमान घातले होते. दरम्यान, सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या तुफान पावसामुळे उद्या होणारा नियोजित हेरिटेज वॉक बुधवारी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यात पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर त्यापुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट राहणार आहे. नागरिकांनी या काळात खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, दोन्ही जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यात रत्नागिरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे. पण, पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे

हे पण वाचा -   🔴4 सप्टेंबर नविन अंदाज-पंजाब डख लाईव्ह हवामान अंदाज | Panjabrao dakh live | Hawaman andaj today live | Weather Update

या दोन दिवस सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्ठी, जगबुडी, काजळी आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाशिष्ठी आणि जगबुडीने गेल्यावर्षी महापुराने अक्षरशः थैमान घातले होते. दरम्यान, सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या पावसामुळे उद्या होणारा नियोजित हेरिटेज वॉक बुधवारी १० ऑगस्ट रोजी होणार आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी अशी सूचना रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

हेही वाचा – मोबाइलवर शेत-जमिनीचा Online Nakasha व आठ अ, 7/12 सातबारा पहा

हे पण वाचा -   चक्रीवादळ मुंबईत धडकणार? 24 तासाचा हवामान अंदाज दि.०२ जुन २०२०

जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची चिंता संपली

सध्या जिल्हयात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरापासून पावसाने जोर धरला आहे. गतवर्षीच्या तुलनेने पाऊस कमी झाला आहे. गेले १०-१५ दिवस पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत पडला होता. कोकणात प्रामुख्याने भात, नाचणी ही शेती पावसाळ्यात केली जाते. लावणीनंतर भातशेतीला पाऊस लागतो. हळवी आणि महान अशा दोन स्वरूपात ही भातशेती केली जाते. पण, पावसाने ओढ दिल्याने पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र, आता पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj