× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Ramchandra Sabale Havaman Andaj – पुढील ७ दिवसात इथे होणार पाऊस

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Ramchandra Sabale Havaman Andaj

Ramchandra Sabale Havaman Andaj : महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ व दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब होऊन पावसाचा जोर आणि प्रमाण कमी होईल. आठवडा अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहील. पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.

उद्यापर्यंत महाराष्ट्रावरील हवेचे दाब उत्तरेस १००२ तर दक्षिणेस १००४ हेप्टापास्कल राहतील. मात्र, मंगळवार (ता.३) पासून पुढे हवेच्या दाबात वाढ होईल. आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ व दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब होऊन पावसाचा जोर आणि प्रमाण कमी होईल. आठवडा अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहील.

अनुक्रमणिका

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

Ramchandra Sabale Havaman Andaj For Next 7 Days

पश्‍चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. पावसाचा जोर कमी झाल्याचे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रकर्षाने जाणवेल. दिवसातील बराच काळ पावसात उघडीप व सूर्यप्रकाश तर काही वेळा पाऊस अशी स्थिती राहील.

Ramchandra Sabale Havaman Andaj
Havaman Andaj Today – Ramchandra Sabale Havaman Andaj

उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब. हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व उत्तर प्रदेश तसेच काश्मीर भागावर हवेचे दाब ९९८ हेप्टापास्कल पर्यंत कमी होत असून पावसाचा जोर वाढेल. या भागात आठवड्याच्या सुरवातीस जोरदार पावसाची शक्यता जाणवेल. एकूणच काही भागात पावसाचे प्रमाण अधिक तर काही भागात अल्प पाऊस अशी स्थिती या आठवड्यात राहील.

कोकण हवामान अंदाज

आज आणि उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. उद्या सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ६५ ते ६८ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ७८ मिमी व ठाणे जिल्ह्यात ६५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याची ताशी वेग १८ ते २३ किमी राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस तर रायगड आणि ठाणे जिल्ह्यात २६ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के तर दुपारची ८४ ते ८८ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र hawaman andaj

आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यात २० ते ३० मिमी पावसाची शक्यता आहे. तर धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात ५ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन तो २४ ते २७ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. सर्वंच जिल्ह्यात कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस व किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ८९ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८२ टक्के राहील.

मराठवाडा Weather Report

मराठवाड्यातील सर्वंच जिल्ह्यात या आठवड्यात पावसाचे प्रमाण अल्प राहील. औरंगाबाद जिल्ह्यात उद्या ३६ मिमी पावसाची शक्यता आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात १२ मिमी, लातूर जिल्ह्यात ८ मिमी नांदेड जिल्ह्यात ७ मिमी तर बीड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात ४ ते ५ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या फक्त नांदेड जिल्ह्यात ३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात २० ते २३ किमी तर हिंगोली व जालना जिल्ह्यात ताशी २५ किमी राहील.

तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात तो ताशी २४ किमी व औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ११ किमी राहील. जेथे वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल तेथे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. हवामान ढगाळ राहून पावसात उघडीप राहील. काही काळ सूर्यप्रकाश तर काही काळ अल्पसा पाऊस असे हवामान आठवडाभर राहील. उस्मानाबाद, लातूर व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७२ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ आजचे हवामान

आज आणि उद्या अमरावती जिल्ह्यात २९ ते ३८ मिमी पावसाची शक्यता आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम या जिल्ह्यात १३ ते १७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २२ किमी राहील. कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७८ टक्के राहील.

मध्य विदर्भ havaman andaj today

आज आणि उद्या यवतमाळ जिल्ह्यात १५ ते १७ मिमी, वर्धा जिल्ह्यात १९ ते २२ मिमी तर नागपूर जिल्ह्यात २५ ते २७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २१ ते २३ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. हवामान पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के तर दुपारची ६६ ते ७४ टक्के राहील.

पूर्व विदर्भ हवामान अंदाज महाराष्ट्र live

चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात आज आणि उद्या चांगल्या पावसाची शक्यता आहे. आज ४३ ते ४५ मिमी आणि उद्या २५ ते २७ मिमी पावसाची शक्यता आहे. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात आज ६३ मिमी व उद्या २५ ते ३४ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग १७ ते १९ किमी राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात किमान तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८९ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र पावसाचा अंदाज

आज कोल्हापूर जिल्ह्यात ५१ मिमी, सांगली जिल्ह्यात ५५ मिमी, सातारा जिल्ह्यात ५० मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ४५ मिमी, सांगली व सातारा जिल्ह्यात ८ मिमी पावसाची शक्यता आहे. आज पुणे जिल्ह्यात २७ मिमी, सोलापूर जिल्ह्यात १३ मिमी व नगर जिल्ह्यात ६ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग २१ ते ३० किमी राहील. कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस व किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के तर दुपारची ७७ ते ८६ टक्के राहील.

हे पण वाचा –

कृषी सल्ला 

  • भात खाचरात पाण्याची पातळी रोप लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १ ते २ सेंमी व रोपांच्या वाढीच्या प्राथमिक अवस्थेत २ ते ३ सेंमी ठेवावी.
  • आडसाली उसाची लागवड १५ ऑगस्टपर्यंत करावी.
  • ज्वारी, बाजरी, मका, चवळी, संकरित नेपियर गवत (फुले जयवंत) इत्यादी चारा पिकांची लागवड करावी.

मित्रांनो, Ramchandra Sabale Havaman Andaj – पुढील ७ दिवसात इथे होणार पाऊस हा लेख कसा वाटलं कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व हि माहिती इतर शेतकऱ्यांना शेयर करायला विसरू नका.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon