नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहुयात हवामान अंदाज मराठवाडा आज live कसा आहे, तसेच हवामान अंदाज पुणे वेधशाळा आज आणि येत्या २४ तासात आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रभर कसा असेल याबाबत सविस्तर माहिती.
हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. तर राज्यात दिनांक 19 जुलै 2024 ला हवामान विभागाने विविध भागांमध्ये येलो, ऑरेंज, तसेच रेड अलर्ट जाहीर केले आहे. या लेखात, आपण राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश या विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हे सविस्तरपणे पाहूया.
रेड अलर्ट:
हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, गोंदिया आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह आणि मेघगर्जेनुसार अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट:
राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, पुणे, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दिवसभरात पडण्याची शक्यता आहे.
येलो अलर्ट:
हवामान विभागाने विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि जालना या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, अहमदनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा
इतर:
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नाही.
निष्कर्ष:
आज दिवसभरात राज्यातील विविध भागांमध्ये वेगवेगळे वातावरण दिसून येईल. बहुतांश ठिकाणी, विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाचा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.