यावर्षी महाराष्ट्रात कसा असेल मान्सून? IMD हवामान अंदाज महाराष्ट्र 2021 | डाउनलोड करा - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

यावर्षी महाराष्ट्रात कसा असेल मान्सून? IMD हवामान अंदाज महाराष्ट्र 2021 | डाउनलोड करा

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला राहणार असून मॉन्सून सामान्य असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, यंदा चांंगला पाऊसकाळ हवामान विभागाचा पहिला अंदाज

हवामान विभागाने 98 टक्के वर्तवली पावसाची शक्यता

जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मॉन्सूनचा पाऊस पडतो. गेल्या तीन वर्षांपासून तो सामान्य आहे. येणारा पावसाळाही त्याला अपवाद नसेल. 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यानचा पाऊस सामान्य मॉन्सून म्हणून गणला जातो. काही दिवसांपुर्वी स्कायमेट या दुसऱ्या हवामान संस्थेनेही मॉन्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केले आहे. त्यानंतर आता सरकारच्या हवामान विभागानेही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही गूड न्यूज दिली आहे.

काय म्हणाले, हवामान विभाग?

हे पण वाचा -   Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

यंदाच्या वर्षी देशातील अधिक भागांत सामान्य मॉन्सून म्हणजेच 96 ते 104 टक्क्यांच्या दरम्यानचा पाऊस पडेल. यावर्षी पाऊसकाळ चांगला राहणार असून मॉन्सून सामान्य असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 98 टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या मे महिन्यात मॉन्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला जाईल.

हवामान विभागाची शेतकऱ्यांसाठी खुशखबर, मॉन्सून संदर्भात वर्तवला मोठा अंदाज
भारतातील जवळपास 20 कोटी शेतकरी आपण लावलेल्या पिकासाठी पावसाची वाट पाहत असतात. याचा अर्थ असा की, देशातील जवळपास 50 टक्के शेतीला अजूनही सिंचनाच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत किंवा त्या पोहोचलेल्या नाहीत. यामुळे कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 14 टक्के वाटा आहे. वास्तविक, कृषी क्षेत्र देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध देते. भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे, म्हणजे जवळपास 50 टक्के लोकांना शेती व शेती आणि शेती उद्योगांमध्ये रोजगार मिळाला आहे.

हे पण वाचा -   Monsoon Update : 'या' तारखेला होणार राज्यात मान्सून दाखल! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

अल निनो म्हणजे काय?
अल-निनोमुळे, पॅसिफिक महासागरामधील समुद्राचा पृष्ठभाग अधिक गरम होतो, ज्यामुळे वारा आणि वेग बदलण्याचा मार्ग बदलतो, ज्यामुळे हवामान चक्रांवर वाईट परिणाम होतो. हवामानातील वाईट बदलामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ आहे आणि बर्‍याच ठिकाणी पूरस्थिती उद्भवते. त्याचा परिणाम जगभर दिसून येतो. अल निनोच्या भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वारंवार दुष्काळ पडतो, तर अमेरिकेत मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी अल निनो जोरात काम करते, त्यावर्षी निश्चितच त्याचा परिणाम मॉन्सूनवर होतो.

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj