Panjabrao Dakh Weather Report : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे विशेष लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने त्यांना याचा मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे पंजाबरावांनी नुकताच 28 फेब्रुवारी रोजी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता.
अनुक्रमणिका
Toggleपंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज
त्यांनी 28 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या आपल्या हवामान अंदाजात चार मार्चपासून राज्यात हवामान बदलणार असल्याच सांगितलं होतं. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात चार मार्चपासून पावसाची शक्यता असून 10 मार्चपर्यंत हवामान हे खराब राहणार आहे. 4 मार्च ते 10 मार्च दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
पंजाबराव यांचा दिनांक 28 फेब्रुवारीला जारी करण्यात आलेला अंदाज सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण खाली व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा.
त्यांच्या मते या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नंदुरबार , धुळे, जळगाव, अहमदनगर, नासिक पट्ट्यात मोठा पाऊस पडेल. दरम्यान त्यांनी हा वर्तवलेला अंदाज सत्यात उतरला आहे. 04 मार्च रोजी रात्री नासिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडला आहे. अहमदनगर मध्ये देखील पावसाची हजेरी राहिली आहे. खानदेशात देखील काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांचा सविस्तर अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाब रावांनी वर्तवलेला सविस्तर हवामान अंदाज आपल्या वाचक मित्रांसाठी घेऊन आलो आहोत. पंजाबरावांच्या मते 10 मार्चपर्यंत राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नासिक, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, शिर्डी, माजलगाव, शिरूर या भागात पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा
तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना होळीच्या सणाला पाऊस हमखास पडतो असे देखील सांगितलं. त्यांच्या मते होळी सण होऊन दोन दिवसांनी कायमच पाऊस पाहायला मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवून आपल्या शेती कामांचे नियोजन आखले पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. निश्चितच, पंजाबरावांचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असल्याने त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज म्हणजेच काळ्या दगडावरची पांढरी रेष अस मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा –
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार