× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Monsoon News : मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये, हवामान विभागानं दिला लाखमोलाचा सल्ला, कारण…

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

Monsoon News : महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी याबाबत भारतीय हवामान विभागानं महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

पुणे : महाराष्ट्रात मान्सून दाखल (Monsoon Arrived in Maharashtra) झालाय ही एक मोठी गोष्ट आहे. मान्सून राज्यात दाखल झाला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचलाय. या भागात पावसानं हजेरी लावलेली आहे. हवामानाचं चित्र मान्सूनच्या प्रवासासाठी (Monsoon) अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी म्हटलं. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार विचारपूर्वक पेरणीचा निर्णय घ्यावा, असं होसाळीकर यांनी म्हटलं.

पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या विविध भागात पोहोचेल. त्यामध्ये मुंबईचा देखील समावेश असेल, असं होसाळीकर यांनी म्हटलं. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस दिसत आहे. मान्सून सर्व राज्यात पोहोचण्यासाठी वाट पाहावी लागेल, असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. 

राज्यात रविवार आणि सोमवारी कोकणात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवेल,असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. ते बीबीसी मराठी सोबत बोलत होते. 

शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?

अलनिनो 2023-2024 मध्ये होता. जानेवारी 2024 मध्ये अलनिनो प्रभावी होता. मात्र, गेल्या चार पाच महिन्यांमध्ये तो झपाट्यानं कमी झाला आहे. मान्सूनला पुरक असणारी ला निना जुलैच्या आसपास प्रभावी असण्याची शक्यता आहे, असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. गेल्या वर्षी जूनमध्ये पाऊस नव्हता, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. ऑगस्टमध्ये पाऊस नव्हता, सप्टेंबरमध्ये पाऊस आला, असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. 

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असं आवाहन के.एस.होसाळीकर यांनी म्हटलं. खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी पाऊस आलेला आहे. हवामान विभाग कृषी विभागाला सल्ले देते. त्या कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार आपाआपल्या ठिकाणच्या जमिनीची ओल बघून, आर्द्रता बघून, किती पाऊस पडलाय. पुर्वानुमान बघून, पुढच्या काही दिवसात पाऊस आहे की नाही त्यांना कृषी विभागाकडून आणि हवामान विभागाकडून मिळतात, त्याचा अंदाज घेऊन पेरणीचं नियोजन करावं, असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. 

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वाट पाहावी, कृषी विभागाच्या सल्ल्यांचा विचार करुन पेरणी करावी, असं ठाम मत असल्याचं होसाळीकर यांनी म्हटलं. राजस्थान आणि उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी 50  अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेलं होतं, हे पाहिले. राज्यात तापमान 46 ते 48 अंश सेल्सिअसवर जाताना पाहायला मिळालं, असंही के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. 

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

दरम्यान, भारतीय हवामान विभागाकडून यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या : 

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon