नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे किती राज्यांमध्ये लवकरच पावसाचे आगमन होणार आहे.
या बद्दलचे अपडेट हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली आहे तर एकंदरीत Panjab Dakh यांचा नेमका आजचा लेटेस्ट अंदाज काय याबद्दल अधिक माहितीसाठी हि पोस्ट पूर्ण वाचा.
तर मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार काही तासातच पावसाचा आगमन हे राज्यात होणार आहे. म्हणून राज्याचा काही तासानंतर आगमन होणार असून शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे व राज्यात वरून राजाचा मुक्काम हा सुमारे आठ दिवस राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मित्रांनो हा पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, आणि पश्चिम विदर्भ या भागांमधील जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल आणि काही काही ठिकाणी या भागामध्ये तर खूपच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्व शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतातील वस्तू, मोटार पाण्याने वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आला आहे. दिनांक 16 ते 22 ऑगस्ट पर्यंत पर असणारा हा पाऊस बीड, परभणी, नांदेड, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार त्यासोबत बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि हिंगोली या भागांमध्ये खूपच जोरदार पडणार आहे.
हे पण वाचा :
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
राज्यातील उर्वरित भागात सुद्धा पाऊस पडेल पण तिथे या प्रकारचा पावसाचे प्रमाण अतिशय कमी असेल आणि त्याचबरोबर जोरदार पावसाचा अंदाज असलेले जिल्हे आपण वर सांगितलेले आहेत.
हे पण वाचा
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे कारण या भागांमध्ये खूपच जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मित्रांनो राज्यासह देशातील इतर राज्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे ज्यामध्ये तामिळनाडू, तेलंगाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि राजस्थान इत्यादी. राज्यांमध्ये सुद्धा सर्वदूर पावसाची हजेरी राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जर या हवामानावर आधारित कृषी सल्ला सांगायचा झाला तर सध्या मूग काढणीस आला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी 16 तारखेच्या आत मुगाची काढणी काढून करून घ्यावी कारण 16 ते 26 पर्यंत खूपच जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
माहिती स्रोत | हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील |
पत्ता | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा ) |
दिनांक | 16 ऑगस्ट २०२१ |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
तर मित्रांनो एकापाठोपाठ एक राज्यांमध्ये दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्यामुळे हा पावसाचा जोर वाढणार असल्याबद्दल ची माहिती देण्यात येत आहे.
तर ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहेत.
शेतकरी मित्रांनी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमचे प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट शिक्षण मध्ये नक्की सांगा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेयर करून कृषी कार्यात योगदान द्या. जय जवान जय किसान.