नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत. आजच्या या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचे हवामान. एकंदरीत पुढील पाच दिवसात कसा असेल वातावरण आणि कोणत्या तालुक्यात पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल या बद्दल अधिक माहितीसाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.
अहमदनगर जिल्ह्यात या वर्षी पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे,धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने औगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत देखील धरणे भरलेली नाहीत. दि. २४/०८/२०२१ रोजी हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्याचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तवला आहे.
- भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, पुढील पाच दिवस अहमदनगर जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील तसेच दि. २५ ऑगस्ट रोजी जामखेड, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव तालुक्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- तसेच कमाल तापमानात १ ते २ अश से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
- भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार, २९ ऑगस्ट ते ४ नोव्हेबर दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- पिकात करावयाचे खत व्यवस्थापन, फवारणी, आंर्तमशागतीची कामे हवामान कोरडे असताना करुन घ्यावीत.
- हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता “मेघदुत” व वीजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरीता “दामिनी” मोबाईल अँपचा वापर करावा असा सल्ला शेतकरी बांधवांना ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विद्या विभाग, मफुकृवि, राहुरी. यांनी दिला आहे.
पुढील तीन दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.
हे पण वाचा :
हे पण वाचा
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
मित्रांनो दररोज अशाच प्रकारे हवामानाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटवर नोटिफिकेशन अवश्य सुरू करा आणि त्याचबरोबर युट्युब वर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ही हवामानाबद्दल ची बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून कृषी पत्रकारितेला हातभार लावा धन्यवाद.