हवामान अंदाज : गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी ३ ते ९ ऑगस्ट या आठवडाभराच्या कालावधीत राज्यात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अनुक्रमणिका
Toggleआजचे हवामान अंदाज 2021 live
सातत्याने पडणारे खंड, कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्ट महिन्यातील अपुऱ्या पावसाने तर चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता मॉन्सूनच्या उर्वरित हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर विदर्भाचा बहुतांशी भाग दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.
आजचा हवामान अंदाज | Havaman Andaj
२६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, कोकणातील पालघर सह मुंबई उपनगरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यात सर्वाधिक, म्हणजेच सरासरीच्या तुलनेत २६० टक्के अधिक पाऊस पडला आहे.
हे पण वाचा-
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
उद्याचा हवामान अंदाज | Hawaman Andaz
मात्र दडी कायम असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (उणे ८३ टक्के), कोल्हापूर (उणे ७४ टक्के) सांगली (उणे ६५ टक्के), रत्नागिरी (उणे ६८ टक्के), विदर्भातील अकोला (उणे ६८ टक्के), मराठवाड्यातील हिंगोली (उणे ६९ टक्के) जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. या शिवाय सिंधुदुर्ग, पुणे, बुलडाणा, वाशीम, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.
हे पण वाचा
असे राहणार पुढील दोन आठवड्यांत तापमान
पावसाने दडी दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. पुढील आठवड्यामध्ये राज्यात कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २६ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यातही कमाल तापमानाचा पारा २८ ते ३२ अंश, तर किमान तापमान २० ते २२ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.