नमस्कार आजचे हवामान अंदाज 2021 LIVE मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज 19 जून आणि जाणून घेऊया आजचे हवामान 2021 अपडेट काय आहे आणि राज्यात कशा प्रकारचे वातावरण राहील.
अनुक्रमणिका
Toggleआजचा हवामान अंदाज कोकण
तर सुरुवात करूया कोकण विभागापासून. तर कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
ज्यामध्ये रायगडमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज राहील, तर पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यानंतर मुंबई शहर आणि उपनगर हे मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे. तसेच ठाणे सुद्धा कोरडा राहण्याचा अंदाज आहे.
हवामान अंदाज पुणे विभाग
पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. याव्यतिरिक्त सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर हे जिल्हे कोरडे राहतील. पुणे-सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो.
हवामान अंदाज नाशिक विभाग
त्यानंतर नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये पावसाचा कुठला इशारा हवामान विभागाने दिला नाही आहे. तरीही एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी येण्याचा अंदाज राहील.
आजचे हवामान अंदाज मराठवाडा
औरंगाबाद, जालना, त्यानंतर परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या परिसरामध्ये आपल्याला पावसाचा कुठला इशारा हवामान विभागाने दिले नाही आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस दिवसभरामध्ये एक ते दोन ठिकाणी येण्याचा अंदाज राहील. त्याचबरोबर सोलापूर नंतर उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा एक प्रकारचा वातावरण आहे हलक्या स्वरूपाच्या सरी एक ते दोन ठिकाणी राज्यात बघायला मिळेल.
हे पण वाचा
आजचा हवामान अंदाज विदर्भ
विदर्भातील जिल्ह्यांचा अंदाज बघितला तर विदर्भामध्ये अकोला, वाशिम, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा तसेच वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कुठलाही पावसाचा इशारा आज दिवसभरासाठी देण्यात आलेला नाही. या भागात प्रामुख्याने वातावरण ढगाळ राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी ह्या येऊ शकतात.
तर अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज राहील.
तर मित्रांनो हा होता आजचा हवामानाचा अंदाज 2021 Live दिनांक 19 जून 2021 साठी. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये आणि फेसबुक वर शेअर करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.
हे पण वाचा –
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav