× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

IMD alerts Weather updates : दोन आठवडे तापमान कसे राहणार, पाऊस कुठे पडणार?

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
दोन आठवडे तापमान कसे राहणार, पाऊस कुठे पडणार

IMD alerts Weather updates : मे महिना आला तरी ऊन तापत नाही. अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. तापमानातील बदलासंदर्भात हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला आहे. या सर्वांचा परिणाम शेतीवर होणार आहे.

मे महिना सुरु झाला आहे. दरवर्षी या दरम्यान अंगाची लाहीलाही होते. परंतु गेल्या चार दिवसांपासून राज्यातील वातावरण उन्हाळ्यासारखे नाही. उन्हाळा असताना अनेक शहरांचे तापमान ३५ अंशांच्या खाली आहे. पुणे, मुंबईत ३२ आणि ३३ अंश तापमान आहे.

अनुक्रमणिका

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

weather tomorrow hourly

यामुळे मे महिन्यातील अंगाची लाहीलाही जाणवत नाही. दुसरीकडे अवकाळीचे संकट कायम आहे. कोकण आणि गोव्यात ४ ते ७ मे पर्यंत काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात ४ ते ८ मे पर्यंत यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात ४ ते ७ मे दरम्यान अवकाळीचे संकट आहे तर विदर्भात ४ ते ६ मे पर्यंत पाऊस पडणार आहे.

तापमान कसे असणार | imd satellite

राज्यात ५ ते ११ मे दरम्यान तापमान वाढीतून दिलासा मिळणार आहे. या काळात तापमान ४० अंशाच्या आत असणार आहे. परंतु त्यानंतर १२ ते १८ मे दरम्यान तापमानात वाढ होणार आहे. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूरचे नोंदवले गेले. सोलापूरमध्ये ३६.६ अंश तापमान होते तर मुंबईत ३३.२ अंश तापमान होते. पुण्याचे तापमानही ३३.९ अंशांवर होते.

पुण्यात पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली आहे. यामुले 6 मे पासून ढगांची गर्दी होणार आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 9 मेपर्यंत सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.

धुळ्यात वातावरणात बदल

धुळे शहरात सध्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण राहते, दुपारी ऊन आणि रात्री मात्र पाऊस पडतो. गेल्या काही दिवसांपासून सकाळी सूर्याचे दर्शन होत नाही. दुपारी तापमान 37 अशांपर्यंत राहते. तर सायंकाळी ढग दाटून येत रिमझिम पाऊस पडतो. यामुळे प्रचंड प्रमाणात उकडा निर्माण झाला आहे.

नांदेडमध्ये पाऊस

नांदेडमध्ये रात्री उशीरा सुरू झालेल्या अवकाळी पावसाने पहाटे चार वाजेपर्यंत झोडपून काढलंय. रात्रभर कोसळलेल्या या पावसाने नांदेडचे कमाल तापमान चोवीस अंशावर घसरलय. त्यामुळे वातावरणात गारठा तयार झालाय. सातत्याने बरसणाऱ्या या अवकाळी पावसामुळे नांदेडमध्ये साथीच्या आजारात देखील वाढ झालीय.

नंदुरबारमध्ये अवकाळी

नंदुरबार आणि नवापूर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे काढणीवर आलेल्या कांदा पपई केळी या पिकांचे नुकसान होणार आहे. तसेच विक्रीसाठी मार्केटात आणलेलं कडधान्यांच्या देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

आजचा हवामानाचा अंदाज

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक05 मे 2023
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2023

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon