IMD Weather – देशासह राज्यातील हवामानावर अद्यापही चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. राज्यासह देशात आजही पावसाची शक्यता आहे. आज महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) देशाच्या काही भागांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील काही भागांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
आजही काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये थंडी वाढू लागली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) देशाच्या विविध भागांसाठी हवामानाचा इशारा जारी केला असून, येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल.
हे पण वाचा
आज राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.तर 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. आज कोकण, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात मध्यम ते दाट धुके पडू शकतात.