× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Krushi Salla | हवामानावर आधारित कापूस, तूर, रब्बी भुईमूग, मका, ज्वारी, सूर्यफूल पिकांसाठी कृषी सल्ला व पीक व्यवस्थापन

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
krushi Salla

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने कापूस, तूर, रब्बी भुईमूग, मका, ज्वारी, सूर्यफूल पिकात पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात (Cotton Crop) वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.  

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस (२५ %) २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ %) ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकातील फुलगळ रोखण्यासाठी एनएए ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

रब्बी भुईमूग पिकात पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी. 

रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी ६० बाय ३० सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. पेरणी करतांना ७५ किलो नत्र, ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि ७५ किलो नत्र पेरणीनंतर एक महिण्यांनी द्यावे.  

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असताना किडनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. 

रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किडनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून ३० दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा ८७ किलो यूरिया प्रति हेक्टरी द्यावा. 

रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून २० दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. बागायती गहू उशीरा पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. गव्हाची पेरणी करतांना १५४ किलो १०:२६:२६ + युरिया ५४ किलो किंवा ८७ किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया ५३ किलो + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ‍किंवा ८७ किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट २५० किलो + ६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र ८७ किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.

सध्या किमान तापमानात घट झाल्यामुळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून बागेस सकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. 

आंब्याच्या मोहोरावरील तूडतूड्यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट (३० %) १३ मिली किंवा थायामिथोक्झाम (२५ %) २ ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.    

हे पण वाचा –

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon