Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढत होता. मात्र आता महाराष्ट्रातील काही भागात हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात आता पावसासाठी पोषक स्थिती तयार होत असल्याचा दावा केला गेला आहे. यामुळे आगामी काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 27 जानेवारी पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि लगतच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. तसेच या कालावधीत मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या परिसरात ढगाळ हवामानाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच हवामान विभागाचा हा अंदाज सत्यात उतरला तर ऐन थंडीत कोसळणारा हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. ढगाळ हवामान आणि पावसामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसणार आहे. सद्यस्थितीला रब्बी हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस कोसळला तर पिकांचं मोठं नुकसान होणार आहे.
आतापर्यंत या वाढत्या थंडीचा रब्बी हंगामातील गहू हरभरा जवस यांसारख्या पिकांना फायदा होत होता. मात्र आता ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे पीक धोक्यात सापडले आहे. हवामान विभागाव्यतिरिक्त आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चीर परिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा देखील हवामान अंदाज समोर आला आहे.
हे पण वाचा
पंजाबराव यांनी वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजात देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पंजाब रावांच्या मते 26 जानेवारी पासून महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. त्यांच्या मते, 26 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत राज्यातील मराठवाडा विदर्भ नाशिक मध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजेच या भागातील प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन यंदा पावसातच होणार आहे.
दरम्यान विदर्भातील पूर्व विदर्भात सर्वाधिक पाऊस कोसळणार आहे तर पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नासिक मध्ये देखील हलका पाऊस राहणार असल्याची शक्यता परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.