Maharashtra rain IMD Alert राज्यात पुन्हा एकदा काहीशा प्रमाणात पावसाने सुरुवात केली आहे. काही राज्यात पावसाची उघडीप सुरु असून काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक, गोव्यासह काही भागांत मागील महिन्यात दमदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाची उपस्थिती अनियमित असल्याने आता राज्यात सध्याच्या अपेक्षित पावसापेक्षा ४४ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, आता देशातील काही भागांत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. यामध्ये 3 आणि 4 ऑगस्ट रोजी किनारपट्टीवरील कर्नाटक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 2 ते 4 ऑगस्टच्या दरम्यान उत्तर कर्नाटक, केरळात पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे. 1 ते ४ ऑगस्ट रोजी दक्षिण कर्नाटकातील काही भागांत आणि 4 ऑगस्टच्या दरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी और कराईकल या भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यासह देशातील छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस झाला असल्याची नोंद आहे. दरम्यान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं होतं. यामुळे अनेक नद्यांना पूर आला होता. आता पावसाचा जोर ओसरला असला तरी पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा
दरम्यान, ईशान्य अरबी समुद्र आणि पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागात पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच या भागातील लोकांना पुढील काही दिवस सावधानगिरीचा इशाराही देण्यात आला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात दमदार पाऊस कोसळला आहे. यामुळे अनेक नद्यांना पूर आला. धरणाची पाणीपातळीही वाढली. मात्र आता पावसाने उसंत घेतली असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 01 ऑगस्ट 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद