Maharashtra Rain Updates: संपूर्ण ऑगस्ट महिन्यात दडी मारल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं. सलग दोन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा सरी कोसळल्या. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला.
अनुक्रमणिका
Toggleयेत्या 48 तासात हवामान अंदाज
मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने राज्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. सध्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, खरीप हंगामातील पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची गरज आहे. अजूनही काही भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत आहे.
लाईव्ह हवामान अंदाज आजचा
अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाचा इशारा (Weather Alert) दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल. मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Today’s Weather Update: महाराष्ट्र मान्सून, आजचे हवामान
त्यामुळे काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणात देखील पावसाची शक्यता (Rain Updates) वर्तवण्यात आली आहे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबदारी बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती देखील निर्माण झाली आहे.
पाऊस कधी पडणार आहे
हळुहळू या चक्रीय स्थितीचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होत आहे. पुढील काही तासांत हा पट्टा मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा
पाऊस अजुन किती दिवस आहे
दरम्यान, येत्या १५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार १८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील, असा असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 15 सप्टेंबर 2023 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.