Maharashtra Weather Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतीपिकांना जीवदान मिळालं आहे.
Maharashtra Weather Updates : यंदाचा पावसाळा संपण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी उरलेला आहे. परंतु अद्यापही राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी झाला आहे.
आजचे हवामान अंदाज
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत मध्य महाराष्ट्रात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय २२ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान कोकण, मुंबई, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा हवामान अंदाज
२९ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता शेवटी का होईना, राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Maharashtra Weather Forecast
यंदाच्या हंगामात मान्सूनने चांगलाच तडा दिला आहे. महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात चौहीकडे मुसळधार पाऊस झाला होता. जून आणि ऑगस्ट हे दोन महिने कोरडेच गेल्याने शेतकऱ्यांच्या हातचं पीक वाया गेलं. परंतु शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करत नव्या जोमाने पीकं उभी केली आहे.
हे पण वाचा
Weather Update: मुंबई, ठाणे, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार
परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करूनही पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस होत असल्याने सोयाबीन, कापूस आणि मका यांसारख्या पिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
१६ व १७ सप्टेंबर २०२३ हवामान अंदाज
- कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागीरी व रायगड जिल्ह्यात; मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, सातारा आणि कोल्हापुर
- जिल्ह्यातील घाट भागात; मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, नांदेड व जालना जिल्ह्यात; विदर्भातील
- बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
- ७ विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
महत्वाचा कृषि सल्ला
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागीरी व रायगड जिल्ह्यातील; मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, सातारा जिल्ह्यात आणि कोल्हापुर जिल्हयातील घाट भागात; मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, नांदेड व जालना जिल्ह्यातील; विदर्भातील अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की, खरीप पिके, भाजीपाला पिके व फळ बागांतून पुरेशा पाण्याच्य निचऱ्याची व्यवस्था करावी.
- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की, पुढील २-३ दिवसांत
खरीप पिकाना खते व कीटकनाशके पावसाची उघडीप पाहून व स्वच्छ वातावरणात दयावी. - कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की, मेघगर्जना व विजांचा
कडकडाट होण्याच्या कालावधीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.
हे पण वाचा
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 17 सप्टेंबर 2023 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी खालील कोपऱ्यात येणाऱ्या बटनावर क्लिक करा.