× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Monsoon 2024 गुड न्यूज आली रे…! महाराष्ट्रातील तळकोकणात या तारखेला येणार मान्सून, विदर्भ-मराठवाड्यात कधी येणार?

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
imd weather

Monsoon 2024 News : मान्सून 2024 (मानसून) बाबत एक गुड न्यूज समोर येत आहे. खरेतर गेल्या काही दिवसांपासून मान्सून बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यंदा मान्सूनचे 19 मे 2024 ला अंदमानात आगमन होणार असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील तळकोकणात या तारखेला येणार मान्सून, विदर्भमराठवाड्यात कधी येणार? याबाबत सविस्तर माहितीसाठी havamanandaj.in वरील हा लेख पूर्ण वाचा.

31 मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. दरवर्षी 1 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजेच 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो. बुधवारी (दि. 15) रात्री उशिरा हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला. जाहीर केलेल्या तारखेत 4 दिवस कमी-जास्त होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली. म्हणजेच 28 मे ते 3 जूनदरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

अनुक्रमणिका

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

Havaman Andaj . हवामान अंदाज

केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या अगोदर अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचत असतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अंदमान आणि निकोबार बेटांवरही मान्सून दोन दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी 21 मे रोजी या बेटांवर मान्सून दाखल होतो. परंतु, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून धडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता; मात्र केरळमध्ये 9 दिवस उशिराने 8 जूनला पोहोचला होता.

यावर्षी 106 टक्के पावसाची शक्यता

‘अल निनो’ आणि ‘ला निना’ असे दोन हवामान प्रकार आहेत. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर या वेळी ‘अल निनो’ची परिस्थिती या आठवड्यात संपली असून, तीन ते पाच आठवड्यांत ‘ला निना’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, ‘अल निनो’दरम्यान सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला होता; तर यंदा ‘ला निना’मुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यावर्षी 106 टक्के पाऊस पडू शकतो, असा अंदाज गेल्या महिन्यात हवामान खात्याने व्यक्त केला होता.

आजचे हवामान

तसेच भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये मान्सूनचे 31 मे ला आगमन होणार असे हवामान खात्याने आधीच जाहीर केले आहे. या जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात. म्हणजेच 28 ते 3 जून या कालावधीमध्ये केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज महाराष्ट्र

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मान्सून कधी सलामी देणार ? तळ कोकणात मान्सून कधी पोहोचणार, पुण्यात मान्सूनचे हजेरी कधी लागणार तसेच विदर्भात मान्सून कधी पर्यंत येऊ शकतो ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

The weather

दरम्यान याच संदर्भात हवामान खात्यातील तज्ञांच्या माध्यमातून मोठी अपडेट समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अंदमान आणि केरळमध्ये मान्सूनचे कधी आगमन होणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून दरवर्षी माहिती दिली जात असते.

हवामान उद्या पाऊस वेळ टेबल

यंदा देखील भारतीय हवामान खात्याने या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानंतर हवामान तज्ञांनी महाराष्ट्रात मान्सून आगमन कधी होणार याबाबत मोठे भाकीत वर्तवले आहे.

हवामान पुणे महाराष्ट्र

हवामान तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे दरवर्षी सहा जून 2024 ला मान्सूनचे तळ कोकणात आगमन होते. तसेच सात जूनच्या सुमारास मान्सून पुण्यात दाखल होत असतो. मुंबईमध्ये 11 जूनच्या सुमारास मान्सून पोहोचत असतो.

भारत हवामान

विदर्भाबाबत बोलायचं झालं तर विदर्भात मान्सूनचे 15 जून च्या सुमारास आगमन होते. यंदा देखील या सामान्य तारखांना मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान पावसाचे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून निर्मिती होत असताना बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात कोणत्याच चक्रीवादळाची निर्मिती झालेली नसल्याने मानसूनला यंदा कोणताचं अडथळा येणार नाही आणि यामुळे राज्यात यंदा वेळेत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान खाते

म्हणजे यंदा ठरलेल्या तारखांनाच Mansoon तळ कोकणात, मुंबईत, पुण्यात आणि विदर्भात धडकणार आहे. निश्चितच मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी ही एक आनंदाची वार्ता राहणार आहे.

जर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनची वेळेत आगमन झाले तर शेती कामांना लवकरच वेग येणार असून यामुळे नियोजित वेळेत शेतकऱ्यांना हंगामातील पीक पेरणी करता येईल आणि यामुळे उत्पादनात वाढ होईल अशी आशा आहे.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon