Monsoon 2023: नमस्कार शेतकरी बांधवांनो, हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. फेब्रुवारी महिना संपत चालला. आता थंडीचा जोर देखील कमी झाला आहे. उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. येत्या काही दिवसात तापमानातं अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भारतीय हवामान विभागाने रब्बी हंगामातील गहू समवेतच बागायती पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असा अंदाज बांधला असून शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करण्याचा सल्ला दिला आहे.
खरं पाहता गेल्या काही वर्षांपासून तापमान वाढीमुळे गहू उत्पादनात कायमच घट झाली आहे यंदा देखील तापमान वाढीमुळे उत्पादनात घट होणार असल्याने रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे एवढं नक्की. अशा परिस्थितीत आता बळीराजाला चाहूल लागली आहे ती पुढील मान्सून हंगामा विषयी.
येता मान्सून कसा राहील, मान्सून काळात चांगला पाऊस पडणार का, अमेरिकेच्या हवामान विभागाने ज्या पद्धतीने अलनिनोमुळे भारतात कमी पावसाचा अंदाज बांधला आहे तसा खरच कमीच पाऊस पडेल का, मान्सून 2023 शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहील की नाही, सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल की जास्त पाऊस पडेल? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत.
हे पण वाचा – आजचे ताजे बाजारभाव
दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मोठी माहिती दिली आहे. यामुळे आज आपण पंजाबरावांनी 2023च्या मान्सून बाबत जी काही माहिती वर्तवली आहे जो काही अंदाज बांधला आहे त्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं पाहता पंजाब रावांनी सर्वप्रथम जी काही एलनिनो बाबत चर्चा रंगली आहे त्याविषयी भाष्य केलं आहे.
पंजाब रावांच्या मते पेरू देशातील समुद्राचे तापमान अर्ध्या अंशाने ज्यावेळी वाढतं त्यावेळी सौम्य एलनिनोचा धोका तयार होतो तसेच या समुद्राचे तापमान दोन अंशाने वाढलं की तीव्र एलनिनोचा धोका तयार होतो, असा दावा जगभरातील वैज्ञानिक आणि संस्था करतात आणि अशी परिस्थिती तयार झाली की जगात दुष्काळाची भविष्यवाणी या संस्थांच्या तसेच वैज्ञानिकांच्या माध्यमातून केली जाते. मात्र पंजाबरावांनी एल निनो असो वा नसो महाराष्ट्रात सात जूनलाच पाऊस हा येतो. याही वर्षी त्यांनी सात जूनलाच पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा –
त्यांच्या मते महाराष्ट्राला दोन समुद्र लाभले आहेत. एक अरबीचा समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. यामुळे जरी अरबी समुद्र कडून सात जूनच्या सुमारास पाऊस पडला नाही तरी घाबरून जाण्याचे काही कारण नाही कारण की 20 ऑक्टोबरच्या दरम्यान भुवनेश्वर, विशाखापटनम, चेन्नई दरम्यान समुद्रात चक्रीवादळ तयार होतं आणि या परिस्थितीमुळे आपल्याकडे पाऊस पडतो. तसेच पंजाबरावांनी यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये 2022 प्रमाणेच चांगला पाऊस पडणार असं भाकीत वर्तवलं आहे. निश्चितच पंजाबरावांच्या या हवामान अंदाजामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा –
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?