Weather Update: गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा (Temperature in pune) घसरला असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Lowest temperature in Maharashtra) नोंद पुण्यात झाली आहे.
10 नोव्हेंबर: अरबी समुद्रात निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर गेल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. तर उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांत पुण्यात देखील तापमानाचा पारा (Temperature in pune) घसरला असून राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Lowest temperature in maharashtra) नोंद पुण्यात झाली आहे. आज पहाटे पुणे जिल्ह्यातील हवेली याठिकाणी सर्वात कमी 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यात पहाटे वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे.
दुसरीकडे, सध्या तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी परिसरात सध्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. संबंधित परिसरात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचा काहीअंशी परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे.
हेही वाचा – राज्यातील 36 जिल्ह्यांचे आजचे कापूस बाजारभाव
त्यामुळे विकेंडला महाराष्ट्रातील कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने शनिवारी (13 नोव्हेंबर) आणि रविवारी (14 नोव्हेंबर) पुण्यासह एकूण 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळणार आहेत.
हेही वाचा- आजचे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे सोयाबीन बाजारभाव
हे पण वाचा
दरम्यान, संबंधित जिल्ह्यात वेगवान वारे वाहणार असून या वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असणार आहे. रविवारी देखील राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून याच अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विकेंड फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पुणेकरांनी लांबचा प्रवास टाळावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 10 नोव्हेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी व पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!
Web Title: Heavy rain with thunderstorms in the state on this date; Meteorological Department warns 11 districts including Pune