Maharashtra Weather Update: आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. काल(रविवारी) अनेक राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली. आज देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra weather for next 5 days@Hosalikar_KS pic.twitter.com/68CcJbvkCq
— Climate Research & Services, IMD Pune (@ClimateImd) June 16, 2024
हवामान विभागाने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील विजाच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील 48 तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तर कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर, खान्देश आणि पूर्व विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे.
अनुक्रमणिका
Toggleहे पण वाचा





मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी
काल(रविवारी) मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. धाराशिव, तुळजापूर आणि उमरगामध्ये पावसाने हजेरी लावली . छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
राज्यात सहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला
महाराष्ट्रात आल्यानंतर नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने रविवारी दिली.