Weather Update Today : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मागील १० दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. आता पुढील २४ तासात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नुकत्याच IMD ने जारी केलेल्या सॅटेलाईट फोटोनुसार सद्य परिस्थितीचा अंदाज घेता येत आहे.
अनुक्रमणिका
Toggleपुढील 5 दिवस पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून वायव्य दिशेला ह्या पट्ट्याची हालचाल होण्याची शक्यता असल्याने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार?
राज्यात आज (दि. २७) मुसळधार पावसाची शक्यता असून रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
अलमपट्टी धरणातून १ लाख २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढविला आहे. या धरणातून १ लाख २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलमपट्टी धरणातून पाणी सोडल्यामुळे पूरपरिस्थिती होण्याची शक्यता कमी झाली आहे.
सावधगिरी बाळगण्याचे हवामान विभागाचे आवाहन
गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकटासह झालेल्या पावसामुळे आहेरी तालुक्यातील महागाव येथे अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. रेड अलर्ट दिलेल्या काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याचा धोका आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कोकण किनारपट्टीलगत संततधार पाऊस
कोकण किनारपट्टीलगत पुढील ५ तासात संततधार पाऊस होईल अशी माहिती हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच दक्षिण भारतासह मध्य भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागात संपूर्ण ढगाळ वातावरण असल्याचे सॅटेलाईट फोटोमध्ये दिसत आहे. पुढील २-३ तास पश्चिम किनारपट्टीला पावसाचा जोर कायम राहणार आहे.
मुंबईत कसा असेल आज पाऊस? (Mumbai Rain Update)
मुंबई शहारत आज पावसाचा जोर कायम राहणार आहे. मागील २४ तासात मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कुलाबाला सर्वाधिक २२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर सांताक्रूझला १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही मुंबईकरांनी बाहेर पडताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशंसाने केले आहे.
Mumbai recieved heavy to very heavy rainfall with isolated extremely heavy🔴 rainfall from 0830 IST of 26.7.23 to 0830 IST of 27.7.23, in mm
Santacruz 145.1
Colaba 223.2🔴
Bandra 106.0
Dahisar 70.5
Ram mandir 161.0
Chembur 86.5
Byculla 119.0
CSMT 153.5
Matunga 78.5
Sion 112.0
कोल्हापूर जिल्ह्यात कुठे किती झाला पाऊस?
कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासात जोरदार पाऊस सुरु आहे. यामध्ये गगनबावडा येथे सर्वाधिक १६२ मिमी तर शाहूवाडीत ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. खाली आम्ही सविस्तर आकडेवारी दिली आहे.
जिल्हा – कोल्हापूर
जिल्हातील तालुका मुख्यालयाची पर्जन्यमानची आकडेवारी (MM)
दिनांक ,27/07/2023🌧️🌧️
1) कागल=13
2) गारगोटी=20
3) हातकणंगले-
4) गडहिंग्लज =32
5) राधानगरी=
6) आजरा=49
7) शिरोळ=5
8) शाहूवाडी-73
9) पन्हाळा= 37
10) गगनबावडा-162🔶
11) चंदगड=