Weather Alert: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट पसरलेली आहे. राज्यात ठिकठिकाणी कमी तापमानाची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर आता 22 आणि 23 जानेवारीला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
अनुक्रमणिका
Toggleलाईव्ह हवामान अंदाज
दुसरीकडे मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. मुंबईतील तापमान 19 अशांवर पोहोचलं होतं. तर, उपनगरांमध्ये तापमान 18 अंशावर पोहोचला असल्याचं दिसून आलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार राज्यात 22,23 जानेवारीला राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यताही वक्त करण्यात आली आहे.
आजचे हवामान संपूर्ण महाराष्ट्र
आज मुंबईतील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून आलं आहे. 22 जानेवारीला रत्नागिरी, रायगड, पुणे, अहमदनगर, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, 23 जानेवारीला तळ कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा:- २ दुधाळ जनावरे गाई /म्हशी गट वाटप योजना 2022, असा करा ऑनलाईन अर्ज
मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा घसरला
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमी तापमानाची नोंद होत आहे. मुंबईत आज पहाटे तापमान 19अंश सेल्सियस नोंदवलं गेलं आहे. सकाळी 7 वाजता मुंबई शहर तसेच मुंबई ऊपनगरात तापमान 18 अंशावर होतं. येत्या दोन ते तीन दिवस मुंबईत असंच तापमान राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे.
हे पण वाचा
नवी दिल्लीत पावसाची हजेरी
राजधानी नवी दिल्ली सह NCR मध्ये काल मध्यरात्री काही भागात पावसाने हजेरी लावली त्यामुळे उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर येत्या शुक्रवारी आणि शनिवारीही राजधानी सह परिसरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे हिमाचल प्रदेशमध्ये सध्या तुफान बर्फवृष्टी होत आहे त्याचा परिणाम उत्तर भारतातल्या थंडीवर दिसून येतोय
सौजन्य व साभार – TV9 मराठी
इतर हवामान अंदाज –
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Jawad Chakrivadal Update |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 20 जानेवारी 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!