Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Monsoon Update: पंजाबराव डख यांचा 12 जुलै पर्यंतचा नवीन हवामान अंदाज । कुठे होणार पाऊस? कसे असेल वातावरण? बघा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Monsoon Update: पंजाबराव डख यांचा 12 जुलै पर्यंतचा नवीन हवामान अंदाज । कुठे होणार पाऊस? कसे असेल वातावरण? बघा

Monsoon Update: गेल्या महिन्यात म्हणजेचं जूनमध्ये पहिला पंधरवाडा हा जवळपास राज्यात सर्वत्र विनापावसाचा गेला. 10 जून ला राज्यातील तळकोकणात मान्सून (Monsoon) आगमन झालं त्यानंतर 11 जूनला मुंबईत मान्सून (Monsoon News) दाखल झाला.

तदनंतर काही तास मुंबई, मुंबई उपनगर ठाणे व आजूबाजूच्या जिल्ह्यात मोसमी पाऊस (Rain) देखील बघायला मिळाला. मात्र राज्यात इतरत्र जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस नव्हता. परंतू जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने, राज्यात मोसमी पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली.

19 जून पासून राज्यात रोजाना भाग बदलत पाऊस पडत होता. यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील आता आटोपल्या आहेत. मात्र असे असले तरी राज्यात अजून काही ठिकाणी मोसमी पावसाची हजेरी बघायला मिळालेली नाही. अशा भागात अजूनही शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली नाही.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

त्यामुळे सध्या शेतकरी बांधव मोसमी पावसाची वाट पाहत आहेत. शेतकरी बांधवांचे सध्या मान्सून अंदाजाकडे बारीक लक्ष लागून आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण राज्यात विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचा सुधारित मान्सून अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) जाहीर करण्यात आला आहे.

पंजाब रावांनी 12 जुलैपर्यंत मान्सून अंदाज वर्तवला आहे. पंजाब रावांनी (Panjabrao Dakh) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार, आज आणि उद्या राज्यात तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस कोसळणार आहे. मात्र आज आणि उद्या राज्यात सर्वदूर पाऊस नसणार याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे देखील यावेळी पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी सांगितले.

दरम्यान, पाच जुलै पासून राज्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. पंजाब रावांच्या मते 5 जुलै ते 12 जुलै यादरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. या कालावधीत ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिलेले आहेत या शेतकऱ्यांची पेरणी देखील होऊ शकते असा अंदाज पंजाबराव डख (Panjab Dakh Weather Report) यांनी वर्तवला आहे.

पंजाब रावांच्या मते, पाच जुलै ते 12 जुलै या दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार असून या कालावधीत सर्वाधिक पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात तसेच मराठवाड्यात पाऊस बघायला मिळू शकतो.

याशिवाय उत्तर महाराष्ट्रात विशेषता जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यातही पाच ते 12 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार असून उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवली आहे. निश्चितच पंजाब रावांचा हा अंदाज शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. पंजाब रावांचा नवीनतम सुधारित मान्सून अंदाजामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाले आहेत.

हे पण वाचा –

आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व चालू पिकांचे बाजारभाव

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक01 जुलै 2022 ते 12 जुलै 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon