× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra Weather Update | हवामान विभागाची मोठी अपडेट, ‘या’ भागांना गारपीटीचा इशारा पहा १ डिसेंबर चा हवामान अंदाज

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
garpit havaman andaj

महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) सुरु असलेल्या पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेला पावसाने राज्याच्या काही भागात मुक्काम केल्याचं पहायला मिळत आहे. अनेक भागात अवकाळी पावसाने शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे.

मेहनतीने पिकं वाढवल्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टाची अक्षरशः नासधूस केली आहे. त्यामुळे पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मात्र अजून सुद्धा राज्याच्या काही भागात गारपीटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अनुक्रमणिका

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

राज्याच्या कोणत्या भागात गारपीटीसह पाऊस पडणार?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी (Heavy Rainfall) पाऊस पडत आहे. राज्याच्या नाशिक (Nashik Rain) आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टी भागावरही पावसाचे ढग असते तरी इथं पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तर सातारा, सांगलीमध्ये किमान तापमानात घट नोंदवली जाऊ शकते अशीही माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे राज्याच्या काही भागात पुढील 48 तासात पावसाची शक्यता सांगितली आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा देखील जाणवत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरासह (Bay Of Bengal) अरबी समुद्रामध्ये सुरु असणाऱ्या हालचाली पाहता महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळत आहे.

48 तासात कोणत्या विभागात पाऊस येणार?

राज्यभरात सुरु असलेला पाऊस कधी निरोप घेणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. मात्र, हवामान विभागाने येत्या 48 तासात विदर्भ आणि राज्याच्या काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा दिला आहे.

नाशिक, पुणे, अहमदनगरसह बीड आणि औरंगाबादमध्येही पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या दरम्यान, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यात कधीपर्यंत पाऊस पडणार?

सध्या ईशान्य अरबी समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, बंगालच्या खाडी भागामध्ये कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीच्या एकत्रिकरणामुळं 30 तारखेपासून वाऱ्यांच्या स्थितीत बदल होणार असून, 2 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळामध्ये याचं रुपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात काही भागात शेतीचं नुकसान झालं आहे.

राज्याच्या कोणत्या भागात पिकांचं नुकसान?

नाशिकसह, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे तूर, हरभरा, गहू, कपाशी आणि भाजीपाला इत्यादी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

News Title : Maharashtra weather update big update from meteorological department thunderstorm warning in this area

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon