भारतीय हवामान विभागानं राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढेल,असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागानं राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. दक्षिण कोकणात सोमवार पासून अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई ठाण्यासह उ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
अनुक्रमणिका
Toggleमान्सूनच्या वाटचालीसाठी योग्य स्थिती
मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, छत्तीसगडस ओडिशा , पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दिशेनं मान्सूनचा पाऊस पुढे जाण्यासाठी वातावरणात योग्य स्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, नांदेड, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केले आहेत.
हे पण वाचा
भारतीय हवामान विभागानं १९ जून रोजी कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२१ जून रोजी राज्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं २१ आणि २२ जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर,सह विदर्भातील भंडारा आणि गोंदिया वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस होईल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे पण वाचा:
- Monsoon arrival : खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती
- पंजाब डख नवीन हवामान अंदाज – राज्यात या तारखेपासून पावसाची हजेरी । Panjab Dakh Weather Alert
- Mansoon 2022: मोठी बातमी! मान्सूनची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार आगमन । आजचा हवामानाचा अंदाज
- Monsoon 2022: हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
- आला रे मान्सून आला… ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून! । Maharashtra monsoon weather
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 18 जून 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद