Monsoon Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, IMD कडून ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार, IMD कडून ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर वाढेल,असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबई : भारतीय हवामान विभागानं राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही पावसाचा जोर वाढेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. दक्षिण कोकणात सोमवार पासून अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई ठाण्यासह उ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

मान्सूनच्या वाटचालीसाठी योग्य स्थिती

मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर, छत्तीसगडस ओडिशा , पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दिशेनं मान्सूनचा पाऊस पुढे जाण्यासाठी वातावरणात योग्य स्थिती असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

हे पण वाचा -   Weather Update: पुढील 2 दिवस इथे हाय अलर्ट; राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट आणि यलो अलर्ट जारी

भारतीय हवामान विभागानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, नांदेड, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केले आहेत.

भारतीय हवामान विभागानं १९ जून रोजी कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

२१ जून रोजी राज्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं २१ आणि २२ जूनला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर,सह विदर्भातील भंडारा आणि गोंदिया वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस होईल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे पण वाचा -   Panjabrao Dakh Havaman Andaj : येत्या 4 दिवस राज्यात फक्त इथे होणार पाऊस, पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज

हे पण वाचा:

नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक18 जून 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

हे पण वाचा -   🔴 Live Maharashtra Weather : 8 ते 13 डिसेंबरचा हवामान अंदाज... कुठं पाऊस तर कुठं थंडी, कसं असेल महाराष्ट्रातील हवामान, माणिकराव खुळे लाईव्ह हवामान अंदाज
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj